यड्रावकर थेट आरोग्यमंत्री, तर सिद्धिविनायकाचा उल्लेख अष्टविनायक
अजित पवारांच्या सोशल अकाऊंटवरील चुकांच्या पोस्ट व्हायरल
मुंबई : खरा पंचनामा
सोशल मिडीयावर पोस्ट करताना जरा जरी इकडे-तिकडे झालं तर लगेच त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल होतात. हे अनेकदा होतं. असाच काहीसा प्रकार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत झाल्याचं समोर आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या सोशल मिडीया एक्स (पुर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून चुकीचे पोस्ट गेल्याचे सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहेत. एका एक्स पोस्टमध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून तानाजी सावंत यांच्या ऐवजी राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या एका एक्स पोस्टमध्ये मुंबईच्या सिद्धिविनायकाचा थेट अष्टविनायकापैकी एक गणपती म्हणून फोटो पोस्ट करून कॅप्शन देण्यात आलेलं आहे.
नुकतीच अजित पवार यांनी मुंबईत मंत्रालयात कोल्हापूर जिल्हयातील क्षारपाड जमिनीसंदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते. याच बैठकीच्या संदर्भात केलेल्या पोस्टमध्ये यड्रावकर यांचा आरोग्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तर दुसरी पोस्ट अजित पवार यांनी सिद्धिविनायकाबाबत 9 जुलैला सर्व आमदारांसोबत दर्शन घेतलं त्या दिवशी करण्यात आलेल्या ट्विट मध्ये मुंबईचा सिद्धिविनायकाबाबत चूकीची माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या सोशल मिडीया एक्स (पुर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून चुकीचे पोस्ट गेल्याचे सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहेत. एका एक्स पोस्टमध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून तानाजी सावंत यांच्या ऐवजी राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात क्षारपड जमीन आहे. सदर तालुका क्षारपड व पाणथळमुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे. संबंधित क्षेत्र सुधारण्याच्या प्रस्तावित योजनांच्या अंमलबजावणीसाठी आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सबंधित इतर अधिकारी यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली. लवकरच योग्य ती पावले उचलली जातील.
दुसऱ्या एका सोशल मिडीया पोस्टमध्ये मुंबईच्या सिद्धिविनायकाचा थेट अष्टविनायकापैकी एक गणपती म्हणून उल्लेख करून फोटो पोस्ट करण्यात आलेले आहेत. अजित पवार यांच्या सोशल मिडीयावरून सातत्यानं होतं असलेल्या चुकीच्या पोस्टमूळे चर्चेचा उधाण आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
