"१०० घेऊन या, अन् सरकार बनवा"
अखिलेश यादव यांची भाजपातील असंतुष्टांना मान्सून ऑफर
लखनऊ : खरा पंचनामा
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपामधील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेला आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे आमने सामने आल्याचे दिसत आहे.
त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांच्य लखनौपासून दिल्लीपर्यंत बैठकांवर बैठका होत आहेत. वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपामधील या वादाचा फायदा घेण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी सुरू केला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही भाजपामधील या सत्तासंघर्षादरम्यान आपली चाल खेळत या असंतुष्टांना मान्सून ऑफर दिली आहे. "१०० घेऊन या आणि सरकार बनवा", अशी ऑफर त्यांनी दिली आहे.
'१०० घेऊन या आणि सरकार बनवा" म्हणजेच १०० आमदारांना सोबत घेऊन या आणि समाजवादी पक्षासोबत उत्तर प्रदेशात सरकार बनवा, असे सूचक आवाहन या माध्यमातून अखिलेख यादव यांनी भाजपामधील असंतुष्टांना केले आहे. अखिलेश यादव यांनी ही ऑफर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना उद्देशून दिल्याचं बोललं जात आहे. योगी आदित्यनाथ आणि केशव प्रसाद मौर्य यांच्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून मतभेद उफाळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अखिलेख यादव यांनी या वादावर खोचक टिप्पणी करत दिलेली ही ऑफर उत्तर प्रदेशच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.