Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"लोकसभेला भाजपच्या लोकांनीही कॉंग्रेसला मतदान केलं"

"लोकसभेला भाजपच्या लोकांनीही कॉंग्रेसला मतदान केलं"



सोलापूर : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या लोकांनीही प्रणिती शिंदेंना मतदान केलं असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. सोलापुरात आयोजीत केलेल्या कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. त्यामुळे शिंदेंना मतदान करणारे भाजपचे लोक कोण? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सोलापूरच्या जनतेने निवडून दिल्याबद्दल, तसेच मित्रपक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्याच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघात कृतज्ञता मेळावे घेतले जात आहेत. काल सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील मंगल कार्यालयात घेतलेल्या कृतज्ञता मेळाव्यात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी विरोधकांनी पैसे वाटल्याचा आरोपही शिंदेंनी केला. विविध तीन चार पक्षाचे लोक आपापल्या परीने सामील झाले होते. मी नऊ दहा निवडणुका लढवल्या. मात्र, या निवडणुकीत कुठल्याही पद्धतीचा त्रास झालेला नाही. सगळे लोक अगदी आनंदाने काम करत होते असेही शिंदे म्हणाले.

आमच्याकडे कोणीही पैशांची मागणी केली नाही असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. आपापले पैसे खर्च करुन लोक प्रयत्न करत होते. आम्हाला बातम्या येत होत्या की, विरोधी पक्ष अमुक ठिकाणी पैसे वाटायला लागले आहेत. अमुक ठिकाण पाकीट झालेली आहेत. पैसे वाटत आहेत. पण आम्ही त्याचीही कधी परवा केलेली नाही असे शिंदे म्हणाले. विजयाचा उन्माद मांडणारे नव्हे तर खाली मान घालून विजय स्वीकारणारे आम्ही असल्याचे शिंदे म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.