कोकणात ढगफुटी! रत्नागिरी - सिंधुदुर्गमध्ये शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रत्नागिरी : खरा पंचनामा
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून खबरदारीचा उपाय म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने महाविद्यालय आणि शाळांना सोमवारी ८ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
रविवारी रात्री उशिरा हे आदेश जारी करण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून रात्री उशिरा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडून हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने सोमवारी सुट्टी जाहीर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देखील शाळा सोमवारी बंद राहणार आहेत. दरम्यान, रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे.
राजापूरला पुराचा वेढा पडला आहे. लांजा येथील काजळी नदीला पूर आला आहे. इतर जिल्ह्यातील चिपळूण येथील वाशिष्टी नदी इशारा पातळी जवळ असून चिपळूण तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.