'पिंजऱ्यातला बंद पोपट', 11 वर्षानंतर सुप्रीम कोर्टाने सीबीआयला करुन दिली आठवण
नवी दिल्ली : खरा पंचनामा
दिल्लीतील दारु घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिलाय. केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना न्यायाधीश भुइया यांनी सीबीआय संबंधी महत्त्वाची टिप्पणी केली.
सीबीआयला पिंजऱ्यातील बंद पोपटाची जी प्रतिमा आहे, त्यातून मुक्त झालं पाहिजे असं न्यायाधीश भुइया म्हणाले. सीबीआयला हे दाखवून द्यावं लागेल, की ते पिंजऱ्यातील बंद पोपट नाहीयत. ते मुक्त आहेत.
'निष्पक्ष तपास झाला नाही, ही धारणा बदलली पाहिजे' असं जस्टिस भुइयां म्हणाले. जामिनाबद्दल जस्टिस भुइंया यांनी सहमती व्यक्त केली. पण CBI च्या अटकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्यांनी अटकेच्या वेळेवर प्रश्न विचारला. सीबीआय प्राथमिक तपास संस्था आहे. तपास व्यवस्थित झाला नाही, असा संदेश नाही गेला पाहिजे. पिंजऱ्यातील बंद पोपटाची सीबीआयची प्रतिमा बदलली पाहिजे असं जस्टिस भुइंया म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.