Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नशेच्या गोळ्या विकणाऱ्या हद्दपार गुन्हेगारासह टोळीला अटक ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त, महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई

नशेच्या गोळ्या विकणाऱ्या हद्दपार गुन्हेगारासह टोळीला अटक
५५ हजारांचा मुद्देमाल जप्त, महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

नशेच्या गोळ्यांचे सेवन करून त्याची विक्री करणाऱ्या हद्दपार गुन्हेगारासह त्याच्या टोळीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून नायट्रोव्हेट गोळ्या, दोन दुचाकी असा ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. 

धनंजय प्रदीप गाडे (वय २२, रा. सुभाषनगर), ओंकार संभाजी साळुंखे (वय २२, मंगळवार पेठ), महम्मदरफीक सादीक गोदड (वय २४, रा. टाकळी रोड, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थाचा वापर तसेच विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी महात्मा गांधी चौक पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार त्यांचे एक पथक मिरजेत गस्त घालत होते. 

पथकातील विक्रम खोत, सूरज पाटील यांना धनंजय गाडे नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पिछाडीस असणाऱ्या बोळात येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे सापळा रचला. त्यावेळी तिघाही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याजवळ नायट्रोव्हेट गोळ्या सापडल्या. त्यांना अटक करून त्यांच्याकडील दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. यातील ओंकार साळुंखे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला हद्दपारही करण्यात आले आहे. त्याच्यासह त्याच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले. 

मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, महात्मा गांधी चौक ठाण्याचे सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, सूरज पाटील, विक्रम खोत, विनोद चव्हाण, अभिजित धनगर, जावेद शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.