Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका! 3 वेळा खासदार, 3 वेळा आमदार झालेल्या बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका!
3 वेळा खासदार, 3 वेळा आमदार झालेल्या बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भारतीय जनता पक्षाला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हणे तथा माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी सून मीनलल पाटील खतगावकर यांच्यासह आज काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.

भास्करराव खतगावकर हे आधी काँग्रेसमध्येच होते. पण पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पण आता त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमित देशमुख यांना मोठं यश आलं आहे. त्यामुळे भास्करराव खतगावकर यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार तथा माजी महापौर ओमप्रकाश पोकर्णा यांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसचे आता ताकद वाढली आहे. कारण या बड्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षप्रवेश केल्यानंतर भास्करराव खतगावकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, राज्याचे माजी मंत्री, मराठवाड्याचे नेते अमित देशमुख, नांदेडचे माजी मंत्री नितीन सावंत, माझ्याबरोबर प्रवेश करणारे माजी आमदार तथा माजी महापौर ओमप्रकाश पोकर्णा, आमचे नांदेड दक्षिणचे मोहनरावजी आंबर्डे, डॉ. मीनल खतगावकर आणि उपस्थित सर्व मान्यवर, मी आज परत माझ्या घरी आलेलो आहे. काँग्रेस पक्षाने मला तीन वेळा खासदार, तीन वेळा आमदार, राज्यमंत्री म्हणून काम करायची संधी दिली", असं भास्करराव खतगावकर म्हणाले.

"मी मधल्या काळात रागापोटी भाजपमध्ये गेलो. पण मला अतिशय आनंद आहे की, नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला मजबूत करण्याचं काम महाराष्ट्रात होत आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली परत काँग्रेस मजबूत व्हायला पाहिजे, तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मविआत सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले पाहिजेत यासाठी मी, ओमप्रकाश पोकर्णा आणि आमचे सर्व सहकारी मित्र नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय. आम्हाला प्रवेश दिल्याबद्दल नाना पटोले आपले आभार", अशी भूमिका भास्करराव खतगावकर यांनी पक्षप्रवेश करताना मांडली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.