अजित पवारांना काळे झेंडे दाखवणाऱ्या भाजप नेत्याला मोठा निधी मंजूर
पुणे : खरा पंचनामा
जिल्ह्यातील भाजपच्या तीन नेत्यांना डीपीडीसीमधून निधी देण्यात आला आहे. हर्षवर्धन पाटील , आशा बुचके आणि बाळा भेगडे यांना १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आशा बुचके यांनी तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना काळे झेंडे दाखवले होते. त्यामुळे या नेत्यांना निधी देऊन महायुतीने अजित पवार गटाल डिवचलं असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
भाजपचे तिन्ही नेते बंडखोरी करणार की काय ? अशी चर्चा होत होती. त्यानंतर डीपीडीसीतून निधी मंजूर झाल्याची चर्चा आहे. कांग्रेसचे दोन आमदार आणि शरद पवार गटाच्या एका आमदाराला निधी वाटपातून वगळण्यात असल्याची चर्चा आहे. एकूण आराखड्यातील ३०० कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र संजय जगताप, संग्राम थोपटे आणि अशोक पवार यांच्या कामांना निधी दिला नसल्याची माहिती आहे.
हर्षवर्धन पाटील, आशा बुचके आणि बाळा भेगडे हे तिन्ही नेते नाराज आहेत. त्यामुळे ते बंडखोरी करण्याची शक्यता होती. असे असताना या तिन्ही नेत्यांना डीपीडीसीमधून निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुसरीकडे, या प्रकारामुळे अजित पवार गट नाराज होण्याची शक्यता आहे. कारण, अजित पवार यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या आशा बुचके यांना देखील निधी मंजूर झालाय.
भाजपच्या तीन नेत्यांना निधी मंजूर झाला असला तरी यातून विरोधकांच्या नेत्यांना डावलण्यात आले आहे. संजय जगताप, संग्राम थोपटे आणि अशोक पवार यांना निधी देण्यात आलेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती नेत्यांना खूष करण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतेच शिंदे गटाच्या नाराज नेत्यांना महामंडळांवर नियुक्त करण्यात आलं आहे. यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना संधी देण्यात आली नसल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.