Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या भंडाऱ्याच्या उपअधीक्षकांची नागपूरला बदली

राज्यातील सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
भंडाऱ्याच्या उपअधीक्षकांची नागपूरला बदली



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने गुरुवारी रात्री बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत. भंडाऱ्याच्या पोलिस उपअधीक्षकांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाचे उप सचिव संदीप ढाकणे यांच्या सहीने काढण्यात आले आहेत.  

बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे नाव कंसात कोठून कोठे बदली ः शारदा राऊत (केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून विशेष पोलिस महानिरीक्षक सागरी सुरक्षा, विशेष सुरक्षा ते सह आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई), अभयसिंह देशमुख (पोलिस अधीक्षक, शस्त्र नियंत्रण शाखा पुणे ते समादेशक रा. रा. बल गट १३, गडचिरोली), गोकुळ राज जी. (समादेशक रा. रा. बल गट ११ नवी मुंबई ते अपर पोलिस अधीक्षक वाशीम), सिंगा रेड्डी (अपर पोलिस अधीक्षक गडचिरोली ते समादेशक रा. रा. बल गट ११ नवी मुंबई), श्रेणिक लोढा (राज्यपाल यांचे परिसहायक ते अपर पोलिस अधीक्षक, अहेरी, गडचिरोली), जी. श्रीधर (पोलिस उपायुक्त पुणे ते पोलिस अधीक्षक सीआयडी, पुणे), मिलींद मोहिते (पोलिस अधीक्षक सीआयडी पुणे ते पोलिस उपायुक्त पुणे).

भंडारा उपविभागाचे पोलिस अधिकारी अशोक बागुल यांची पोलिस उपअधीक्षक नागरी हक्क संरक्षण नागपूर या पदावर बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.