वीस हजारांची लाच घेताना पोलिस हवालदाराला अटक
महिलेचाही समावेश, सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
नातेवाईकावर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी वीस हजार रुपयाची लाच घेताना एका महिलेसह जत पोलीस ठाण्यातील हवालदारास अटक करण्यात आली. गुरुवारी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
हवालदार विजयकुमार दत्तात्रय कोळेकर (वय ४८, रा. नांगोळे), श्रीमती अफसाना नदीम नदाफ (वय ४४ रा. जत) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार यांच्या नातेवाईकाच्या विरुध्द जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये एकुण ८ संशयित असून पैकी ७ जणांना अटक केली होती. गुन्ह्यातील उर्वरीत एकाला अटक करणे बाकी होते. अटक आरोपी तपासात मदत करुन आरोर्पींची न्यायालयीन कोठडीची मागणी करुन त्यांचा जामीन करुन देण्यासाठी २० हजार रुपये व यातील अटक करणेचे बाकी असलेल्या आरोपीला अटकपूर्व जामीनास मदत करण्यासाठी ५० हजार रुपये असे तक्रारदार यांच्याकडे एकुण ७० हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज दि. २६ रोजी अन्टी करप्शन ब्यूरो सांगली येथे दिला होता.
कोळेकर याने जत पोलीस ठाणे येथे दाखल असले मारामारीचा गुन्ह्यात आरोपी यांना तपासात मदत लाचेची मागणी करुन चचेअंती २० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पत्न झाले. त्या अनुषंगाने जत पोलीस ठाणे येथे सापळा लावला असता, कोळेकर याने लाचेची मागणी करुन त्याच्या सांगण्यावरुन खाजगी महिला श्रीमती अफसाना नदीम नदाफ (रा.आर. आर. कॉलेजच्या पाठीमागे, मारुती सुझुकी शोरुमच्या समोर, जत ) तक्रारदार यांचेकडून लाच म्हणून २० हजार रुपये स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तसेच हवालदार विजयकृमार दत्तात्रय कोळेकर याने तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री.उमेश पार्टील, निरीक्षक विनायक भिलारे यांच्या मार्गदर्शनाने धनंजय खाडे, ऋषिकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, सिमा माने, अजित पाटील, प्रितम चौगुले, सलीम मकानदार, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, राधिका माने, चंद्रकांत जाधव, अतुल मोरे, विना जाधव, चालक विट्ठल राजपुत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.