Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील पत्रकारांच्या मागण्यांसाठी मंगेश चिवटे मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार!

राज्यातील पत्रकारांच्या मागण्यांसाठी मंगेश चिवटे मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार!



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्रातील पत्रकारांच्या मागण्या आणि राज्याचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना साकडे घालणार आहेत. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मंगेश चिवटे यांना मुख्यमंत्र्यांना संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची प्रत सादर केली.

पूर्वाश्रमीचे पत्रकार असलेल्या चिवटेंना पत्रकारांच्या प्रश्नांविषयी विशेष आस्था आहे. ज्येष्ठ पत्रकारांच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती मार्फत दिल्या जाणाऱ्या सन्मान मानधन (पेन्शन) व राज्याचे डिजिटल मिडिया धोरण या संदर्भात मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याचा शब्द त्यांनी दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.