दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले 'माजी'; केली उत्तराधिकाऱ्याची निवड
दिल्ली : खरा पंचनामा
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला मंगळवारी नवा मुख्यमंत्री मिळला आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणातून तुरुगातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यानंतर आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आम आदमी पार्टी विधिमंडळ पक्षाचे नवे नेते आणि दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी अरविंद केजरीवाल व आपच्या आमदारांनी विधिमंडळ नेतेपदी अतिशीनिवड केली. या निवडीनंतर अतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झाले आहे.
आम आदमी पार्टीने २६ आणि २७ सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांचे पहिले भाषण होऊ शकते. केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. त्यामध्ये शिक्षणमंत्री आतिशी यांचेच नाव आघाडीवर होते.
आतिशी या केजरीवाल तसेच मनीष सिसोदिया यांच्या सर्वात विश्वासू सहकारी मानल्या जातात. केजरीवाल यांच्या सरकारमध्ये त्या दुसऱ्या क्रमांकाच्या जास्त अधिकार असलेल्या मंत्री होत्या.
अतिशी यांच्याकडे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये वित्त, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभाग, ऊर्जा, महसूल, कायदा, नियोजन, सेवा, माहिती आणि प्रसिद्धी आणि दक्षता यासारखी महत्त्वाची खाती होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.