Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड



मुंबई : खरा पंचनामा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला पास न काढता मंत्रालयात शिरली. सचिवांसाठी असलेल्या गेटने महिलेने मंत्रालयात प्रवेश केला. या महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर ही महिला इथून निघून गेली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी या महिलेचा शोध सुरु केला आहे. पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे.

मात्र, या घटनेमुळे मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. ही महिला गुरुवारी रात्री मंत्रालयात शिरली. त्यावेळी मंत्रालयाच्या परिसरात फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे ही महिला कोणाच्याही लक्षात न येता सचिवांच्या गेटने सहजपणे आतमध्ये शिरली. यानंतर ही महिला फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर केली आणि त्याठिकाणी तोडफोड केली. या महिलेने कार्यालयाबाहेर देवेंद्र फडणवीसांची नेमप्लेट काढून फेकली आणि यानंतर घोषणाबाजी केली. ही महिला नक्की काय म्हणत होती, हे अद्याप समजू शकलेले नाही. ही महिला कोण होती, ती विनापास आतमध्ये कशी शिरली, या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाही. मरिनड्राईव्ह पोलिसांनी सध्या या घटनेचा तपास सुरु केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.