नागपूर ऑडी अपघातः संकेत बावनकुळेही कारमध्ये होता; पोलिसांची कबुली
नागपूर : खरा पंचनामा
मुंबई आणि पुण्यातील हिट अँड रनच्या अपघातांनी राजकारणी, पोलीस यंत्रणांना सळो की पळो करून सोडलेले असताना रविवारी मध्यरात्री भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाच्या ऑडी कारने दोन कार व एका दुचाकीला धडक देत पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या कारमधील दोघेजण मद्यधुंद अवस्थेत होते हे पोलिसांनी कबुल केले आहे. परंतू, या कारमध्ये बावनकुळेंचा मुलला संकेतही होता, हे पोलिसांना मद्यधुंद तरुणांच्या चौकशीतून समजले आहे. आता दोन दिवसांनी संकेत बावनकुळेची टेस्ट घेतली जाणार का, घेतली तर ती पॉझिटीव्ह येईल का असे अनेक प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत.
रामदासपेठ येथील सेंट्रल बाजार मार्गावर ऑडी कारने हा हिट अँड रनचा अपघात केला आहे. पोलिसांनी एबीपीला दिलेल्या माहितीनुसार या कारमध्ये तीनजण होते. यात बावनकुळेंचा मुलगाही होता. अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार हे दोघे मद्य प्राशन करून होते. या दोघांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. अर्जुन वाहन चालवत होता. या दोघांच्या चौकशीत अपघात झाला तेव्हा संकेतही होता व ड्रायव्हरच्या बाजुच्या सीटवर बसला होता, असे समोर आले आहे. अर्जुनवरच गुन्हा दाखल असून संकेत आणि रोनितवर गुन्हा दाखल नाही. तपास सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले. लायसन आहे नाही, गाडी चालकाकडे कशी गेली याची चौकशी सुरु असल्याचेही ते म्हणाले.
अर्जुन आणि रोनितच्या चौकशीत संकेतही त्यांच्यासोबत होता, असे आम्हाला समजल्यामुळे सोमवारी रात्री संकेत वाबनकुळेला चौकशीला बोलविले होते, असे पोलिसांनी सांगितले आहे. हे तिघे लाहोरी हॉटेलच्या बारमधून येत होते. आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही, सीसीटीव्ही डिलीट केले हे सत्य नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.