विधानसभा निवडणुकीसाठी शिक्षक देण्यास नकार; शाळेवर गुन्हा
कल्याण : खरा पंचनामा
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. आता याच विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शिक्षक देण्यास नकार देणं एका शाळेला महागात पडलं आहे. शाळेने निवडणुकीच्या कामासाठी शिक्षक देण्यास नकार त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी डोंबिवलीतील शाळेने शिक्षक देण्यास नकार दिला. त्यानंतर राष्ट्रीय कर्तव्याच्या कामात कसूरी केल्याचा ठपका ठेवत डोंबिवलीमधील सिस्टर निवेदिता शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या शाळेने आगामी विधानसभा निवडणूक कामासाठी शिक्षक देण्यास महसूल अधिकाऱ्यांना नकार दिला होता. त्यानंतर शाळेने निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शाळेतील शिक्षक देण्यास महसूल अधिकाऱ्यांना नकार दिला. त्यानंतर राष्ट्रीय कर्तव्याच्या कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सिस्टर निवेदिता शाळा प्रशासनाच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.