"मनोज जरांगेंची मागणी योग्यच, मराठा आरक्षणाला आमचा जाहीर पाठिंबा"
रत्नागिरी : खरा पंचनामा
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. रत्नागिरीमध्ये शरद पवार एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांची मागणी योग्यच आहे. एकप्रकारे शरद पवार यांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले.
शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरन उपोषणाला पाठिंबा दिला. जरांगे यांची मागणी योग्य असल्याने आरक्षणाला पाठिंबा आहे. त्याशिवाय इतर समाजाचाही विचार व्हावे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.
एक देश एक निवडणूकबाबत कायदेशीर लढाई आणि मार्ग काढणे गरजेचं आहे. घरात तरी काका आणि पुतणे एकत्र आहेत. पहिल्यांदा आम्ही तिघांनाचा निर्णय घेऊ आणि त्यानंतर मग छोट्या पक्षांना बरोबर घेऊन त्यांना किती जागा द्यायचा याबत निर्णय घेऊ. मुंबई गोवा महामार्गसारखा इतका वाईट रस्ता महाराष्ट्रात आहे. महामार्गाच्या कामात किती बेफिक्रेने पाहिलं जातंय हे दुर्दैव आहे, असेही पवार म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.