Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्तव्य बजविताना पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू

कर्तव्य बजविताना पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू



राजगुरूनगर : खरा पंचनामा 

खेड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक संदीप गोरक्ष पर्वते (वय ३५) मुळगाव अकलूज, जिल्हा सोलापूर) यांचे कर्तव्य बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आईवडील, भाऊ असा परिवार आहे.

गेल्या महिन्यापूर्वी ते खेड पोलीस ठाण्यात बदली होऊन आले होते. सकाळी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. पोलीस कर्मचारी अर्जुन गोडसे व सहकाऱ्यांनी त्यांना साळुंखे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. पुढील उपचारासाठी चाकण येथील रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.