घटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर होणार महायुतीच्या 100 उमेदवारांची पहिली यादी?
मुंबई : खरा पंचनामा
लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचं वारं राज्यात वाहू लागलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता महायुती आणि महाविकास आघाडीमधील कोणत्या घटक पक्षाला विधानसभेच्या किती जागा मिळणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावर बैठकांचं सत्र सुरूच आहे. सह्याद्री अतिगृहात महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती होती. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतचे 100 उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपाचे ५०, शिवसेनेचे ३६ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे १४ उमेदावरांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. उद्या उमेदवारांची पहील यादी महायुतीकडून जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. बहुतांश विद्यमान आमदारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवाय स्टार प्रचारकांच्या नावावर देखील आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.