Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अनंत आणि मुकेश अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला!

अनंत आणि मुकेश अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला!



मुंबई : खरा पंचनामा

उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे पुत्र अनंत अंबानी हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाल्याची माहिती समोर आहे. दरम्यान अंबानी पिता-पुत्र ठाकरे यांच्या भेटीसाठी का गेले आहेत याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे. याचबरोबर काही दिवसांत विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. अंबानी पिता-पुत्र उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशात यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने यासाठी राज्यातील विविध भागांत दौरे सुरू करत प्रचाराला सुरूवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे यांनी मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा केला होता. आता ठाकरे पुणे आणि मावळ भागातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

एककडे अंबानी कुटुंब उद्योग तर दुसरेकडे ठाकरे कुटुंब राजकारणा आहे. असे असूनही दोन्ही कुटुंबियांमध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे पाहायला मिळते. कारण अंबानी आणि ठाकरे यांच्यात कायम भेटी होत असतात. मुकेश अंबानी यापूर्वीही अनेकवेळा उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेल्याचे पाहायला मिळाले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.