राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन
काही दिवसांपूर्वी झाला होता भीषण अपघात
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची निघृणपणे हत्या करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे दुर्दैवी निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. शनिवारी (ता. १३, ऑक्टोबर) रात्री १० वाजण्याच्या सुमारास समीर खान यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच समीर खान यांचा कुर्ला येथे मोठा अपघात झाला होता. या अपघातात समीर खान हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र १५ दिवसानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
१८ सप्टेंबर रोजी मुंबईच्या क्रिटीकेअर रुग्णालयातून रेग्यूलर चेकअप करून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली होती. समीर खान हे कारमध्ये बसत असताना त्यांच्याच गाडीच्या चालकाकडून अॅक्सिलेटर दाबला गेल्याने समीर खान कारसोबत फरफटत गेले. यामध्ये त्यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तात्काळ आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
समीर खान हे गाडीत बसत असतानाच ड्रायव्हरकडून ही चूक झाली आणि गाडी फुल स्पीडने जाऊन भिंतीला आदळली. त्यावेळी कारने चार ते पाच दुचाकीना देखील जोरदार धडक दिली. दरम्यान, या अपघातानंतर समीर खान यांची कार चालवणारा ड्रायव्हर अब्दुल अन्सारी याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.