Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिक्षक पतीने शिक्षिका पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून केला खून! कौटुंबीक वादातून मुरगुड येथील घटना

शिक्षक पतीने शिक्षिका पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून केला खून! 
कौटुंबीक वादातून मुरगुड येथील घटना



कोल्हापूर : खरा पंचनामा
     
येथील साई कॉलनीत राहाणाऱ्या एका शिक्षकाने कौटुंबिक वादातून आपल्या शिक्षक पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केला. मंगळवारी  सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेची मुरगूड पोलीसात नोंद झाली आहे. पोलीसांनी शिक्षक पतीला अटक केली आहे.
            
सौ. सविता परशराम लोकरे (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे.  साई कॉलनीत शिक्षक परशराम पांडुरंग लोकरे (वय ५३) असे संशयित पतीचे नाव आहे. लोकरे दाम्पत्य अपूर्वाई बंगल्यात एक मुलगा व दोन मुली अशा कुटुंबासह राहात होते. परशराम लोकरे व त्यांची पत्नी सविता यांच्यात कौटुंबिक कारणातून वारंवार वाद होत होता. आज सकाळी चहापान सुरु असतानाच या दोघात  वाद सुरु झाला. यावेळी त्यांच्या मुलांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला पण शेवटी वाद टोकाला गेला. 

त्यानंतर धुण्याभांड्याच्या चौकात सविता गेल्या असता परशराम यांनी राग अनावर झाल्याने वरवंटा घेवून धावत पत्नी सविताच्या डोक्यात घातला. यात त्या खाली कोसळल्या.  त्यांच्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या व जागीच ठार झाल्या.
         
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी  मुरगूड ग्रामीण रुग्णालयात हलविला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनीही दुपारी घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती घेतली. अपूर्वा परशराम लोकरे (वय २५) हिने मुरगूड पोलीसात फिर्याद दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.