नारायण राणे यांचा पराभव करणा-या तृप्ती सावंत यांना मनसेची उमेदवारी
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा आणि माजी आमदार तृप्ती सावंत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आणि आज त्यांना वांद्रे पूर्व मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी जाहीर झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना एबी फॉर्म दिला. त्यामुळे या मतदार संघात आता तिरंगी लढत होणार आहे.
या मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिली आहे. मातोश्रीच्या अंगणात ही निवडणूक होणार आहे.
२०१५ मध्ये शिवसेनेचे तत्कालीन आमदार प्रकाश सावंत यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावेळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा त्यांनी पराभव करुन २० हजारांच्या मताधिक्याने विजयी मिळवला होता.
मुंबई भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा आणि माजी आमदार श्रीमती तृप्ती सावंत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आणि आज त्यांना वांद्रे पूर्व मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी जाहीर झाली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.