लाडक्या बहिणींवर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य; धनंजय महाडिकांना निवडणूक आयोगाचा दणका
कोल्हापूर : खरा पंचनामा
"लाडकी बहिणी योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या प्रचार फेऱ्यांमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, आम्ही त्यांची व्यवस्था करतो", असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी रात्री (दि.९) कोल्हापुरात आयोजित एका प्रचारसभेत बोलताना केलं. त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यानंतर त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.
लाडक्या बहिणीबाबत वादग्रस्त विधान केल्याने निवडणूक आयोगाने महाडिक यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीला सात दिवसाच्या आत उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे महाडिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत विरोधी पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.