Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'त्या' बिअर बारवर कारवाई करून अहवाल द्या सत्यमेव जयते संघटनेच्या मागणीवर उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांना आदेश

'त्या' बिअर बारवर कारवाई करून अहवाल द्या
सत्यमेव जयते संघटनेच्या मागणीवर उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांना आदेश



मुंबई : खरा पंचनामा

बहुतांशी बिअर बारमध्ये मंजूर नकाशाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी मद्यप्राशन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या बारच्या अनुज्ञप्तीधारकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सत्यमेव जयते संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रभात हेटकाळे यांनी केली आहे. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारवर नियमाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करून त्याचा अहवाल आयुक्त कार्यालयाला पाठवण्याचे आदेश राज्यातील सर्व अधीक्षकांना राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत देण्यात आले आहेत. या आदेशामुळे नियमभंग करणाऱ्या बार चालकांचे धाबे दणाणले आहेत. 

सत्यमेव जयते संघटनेचे श्री. हेटकाळे यांनी राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे मंजूर नकाशाचे उल्लंघन करणाऱ्या बारवर मुंबई दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६८ व ६४ नुसार कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. त्याची दखल घेत नियमभंग करणाऱ्या बार अनुज्ञप्तीधारकांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्कचे उपायुक्त (निरीक्षण) सुभाष बोडके यांच्या सहीने काढण्यात आले आहेत. राज्यातील राज्य उत्पादन शुल्कच्या सर्व अधीक्षकांना त्या आदेशाचे मेल पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीनंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग आता या कारवाईसाठी सरसावला आहे. 

दरम्यान हेटकाळे यांनी केलेल्या तक्रारीच्या प्रकरणी चौकशी व नियमान्वये आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उलटटपाली आयुक्त कार्यालयास सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या आदेशामुळे आता बारमधील मंजूर नकाशाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी मद्यप्राशन करण्यास परवानगी देणाऱ्या बारवर आता कठोर कारवाई करण्याचे संकेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.