Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ना टीका, ना टिप्पणी फक्त विकासकामांचा प्रचार... शिरोळ मतदारसंघात मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकरांचा अनोखा प्रचार

ना टीका, ना टिप्पणी फक्त विकासकामांचा प्रचार...
शिरोळ मतदारसंघात मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकरांचा अनोखा प्रचार



जयसिंगपूर : खरा पंचनामा

सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या खालच्या थरावरील टीकेने टोक गाठले आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण कलुषित झाले आहे. असे असताना शिरोळ मतदारसंघ मात्र त्याला अपवाद ठरला आहे. शिरोळचे महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अनोख्या प्रचाराची सध्या पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांवर, विरोधी पक्षांवर टीका, टिप्पणी न करता केवळ मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ना. यड्रावकर मतदारांना सामोरे जात आहेत. 

राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचाराचा जोरदार धुरळा उडाला आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार प्रयत्न करत आहेत. आपणच मतदारसंघासाठी कसे सक्षम आहोत हे पटवून देण्यासाठी बऱ्याच उमेदवारांकडून प्रतिस्पर्धी उमेदवार, विरोधी पक्षांवर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. मतदारसंघातील विकास कामे, रखडलेले प्रश्न, शेतकरी, युवक, महिला यांच्या समस्यांचा उहापोह करण्याऐवजी अनेकजण विरोधकांवर केवळ टीका करण्यात धन्यता मानत असल्याचे दिसत आहे. मात्र याला शिरोळ विधानसभा मतदारसंघ ठरला आहे. महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार ना. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मात्र प्रचारात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्याची संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात जोरदार चर्चा होत आहे. 

उमेदवारी जाहीर केल्यापासून डॉ. यड्रावकरांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आजपर्यंत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखाच मतदारांपुढे मांडला आहे. शिवाय गेल्या पाच वर्षात दिलेला निधी सोडून भविष्यात गावागावांमध्ये राबवण्यात येणाऱ्या योजनांची ब्लू प्रिंटच ते मतदारांपुढे ठेवत आहेत. या संपूर्ण प्रचार काळात त्यांनी कोणत्याही प्रतिस्पर्धी उमेदवारावर कसलीही टीका केली नाही. अन्य राजकीय पक्ष त्यांचे राज्य, देश पातळीवरील नेत्यांवरही टीका केलेली नाही. केवळ महायुतीचे घोषणापत्र आणि डॉ. यड्रावकर भविष्यात करणार असल्याच्या विकासकामांवरच ते मतदारांशी संवाद साधत आहे. त्यांच्या प्रचाराच्या या अनोख्या पद्धतीमुळे त्यांना मतदारसंघात मोठ्या प्रमाणात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.