Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या सांगोल्यातील दोघांना अटक ११.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या सांगोल्यातील दोघांना अटक 
११.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

आटपाडी-दिघंची रस्त्यावर अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करताना सांगोला (जि. सोलापूर) येथील दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून छोटा हत्ती वाहनासह ११.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. 

नवाज बादशाह मुलाणी (वय २५), जुबेर जमीर मुलाणी (वय २२, दोघेही रा. एकतपूर रोड, सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या अमंली पदार्थ तसेच गुटख्याची विक्री, वाहतूक, तस्करी  करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक वर्धन यांचे एक पथक तयार केले होते. पथक आटपाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी छोटा हत्ती (एमएच ४४ एएफ ४५०२) मधून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने आटपाडी-दिघंची रस्त्यावर सापळा रचला होता. 

मिळालेल्या माहितीप्रमाणे वाहन आल्यानंतर पथकाने ते अडवले. वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये विविध कंपन्यांचा पानमसाला, गुटखा, सुगंधी तंबाखू आढळून आली. त्याबाबत वाहनातील नवाज मुलाणी, जुबेर मुलाणी यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगोला येथील अभिजित मस्के याच्याकडून हा माल आटपाडी येथे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यानंतर वाहनासह मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. दोघांविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. 

एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, हणमंत लोहार, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, सूरज थोरात आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.