Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नेत्यांचा गुजरातवरच अधिक विश्वास! अहमदाबाद, सुरतहून निवडणुकीचे प्रचार साहित्य

नेत्यांचा गुजरातवरच अधिक विश्वास! 
अहमदाबाद, सुरतहून निवडणुकीचे प्रचार साहित्य



मुंबई : खरा पंचनामा

निवडणुकीच्या प्रचाराचे साहित्य बनवणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांकडे नेते-कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्यामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. या साहित्यासाठी राजकीय पक्षांनी अहमदाबाद व सुरतच्या घाऊक विक्रेत्यांवर विश्वास दाखवल्याने हे दिवस आल्याची प्रतिक्रिया स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली आहे.

निवडणूक प्रचारसाहित्य बनवणारे आणि विकणारे अनेक छोटे व्यापारी परळ-लालबागमध्ये आहेत. मात्र यावेळी त्यांचाही विशेष व्यवसाय झालेला नाही. 'यावेळी राजकीय पक्षांनी थेट गुजरातच्या घाऊक विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर एकत्रित प्रचारसाहित्य मागवून त्याचा पुरवठा उमेदवारांना केला. त्यामुळे आमच्याकडील खप मोठ्या प्रमाणावर कमी झाला,' असे लालबागच्या योगेश पारेख यांनी सांगितले.

पारेख ब्रदर्स ७५ वर्षांपासून प्रचारसाहित्याची विक्री करत आहेत. मात्र मागील पाच सहा वर्षांत ही परिस्थिती बदलल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राजकीय पक्षांचे झेंडे, टोप्या, उपरणी, फेटे हे कार्यकर्त्यांच्या आवडीचे आहेत. मात्र, आता त्यांचा पुरवठा महाराष्ट्राबाहेरून होतो. आता मोठ्या प्रचार फेरीदरम्यान साहित्याचा तुटवडा भासला तरच कार्यकर्ते आमच्याकडे साहित्य खरेदी करतात, असे पारेख यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.