तुमच्या डोळ्यासमोर कमळ येईल पण घड्याळाचं बटण दाबा
त्यांनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं
बीड : खरा पंचनामा
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीनं आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. यावेळी पकंजा मुंडे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. भाऊबीजेला बहिणीनं भावाला ओवाळायचं असतं अन् बहिणीला जेवण द्यायचं असतं. ही भाऊबीज आगळी वेगळी करु असा विचार केल्याचं त्यांनी म्हटलं. जो भाऊ एका दशकानंतर ओवाळणीला आला तो माझा भाऊ, या एक दशकात जेव्हा माझा भाऊ माझ्यापासून दूर होता तेव्हा माझी काळजी घेणारे माझे भाऊ या सगळ्यांची मिळून दिवाळी साजरी करतोय, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
खरंतर त्या काळात जेव्हा श्रीकृष्ण जेव्हा गेले होते शिष्टाई करायला कौरवांच्या दरबारात, युद्ध नको युद्ध नको पांडवांना फक्त पाच गावं द्या, कौरवांनी ते स्वीकारलं असतं तर कदाचित महाभारत टळलं असतं. कदाचित महाभारत याच्यासाठी होत असाव न्याय अन्यायाच्या लढाईत न्यायाचा विजय होतो. पण राजकारणातलं महाभारत वेगळं आहे. राजकारणात महाभारत घडवलं जातं. राजकारणात भावा भावात वितुष्ट आणलं जातं. कुणाच्याही खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केल जातं. युद्ध टळल असतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मी जेव्हा 2009 ला राजकारणात आले तेव्हा एक महिना आधी माझ्या घरी धनूभाऊ तुझ्या प्रचाराला येणार नाही. प्रीतम मुंडे यांचं लग्न असल्याचं कारण सांगितलं होतं. माझ्या मनात देखील नव्हतं विधानसभा लढवायची आहे. कधी डोक्यात नव्हतं की परळी विधानसभेची पहिली महिला आमदार होईनं. माझ्या जीवनात काही वाईट केलं नाही. एक चांगलं केलं माझ्या बापाचा शब्द खाली पडू दिलं नाही. धनंजयला माहिती आहे लग्नपत्रिका छापल्यानंतर नवरा बघितला, आताच्या काळात असं होतं नव्हतं. माझा एवढा विश्वास गोपीनाथ मुंडेंवर होता, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
आता विधानसभेत आपले कमळ चिन्ह नाही, पण तुम्ही मशीनवर कमळ शोधणार आहात हे मला माहीत आहे. तुम्ही कमळ शोधणार आहात आता वाटते कमळ डोळ्यासमोर धरा आणि घड्याळाचं बटण दाबा, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
धनुभाऊ राष्ट्रवादीकडे गेले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी कमळाचं बटण दाबलं होतं. आता असं वाटतं की धनंजय मुंडे यांनी कमळ घेतल असत तर बरं झालं असतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आता आपल्याला धनंजय मुंडेंना आमदार करायचा आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.