अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही
न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
मुंबई : खरा पंचनामा
अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिलेली नाही. मी माझ्या अहवालात क्लीनचीट हा शब्दच वापरला नाहीय. परमबीर सिंह यांनी जी माघार घेतली, त्याबद्दल मी माझ्या अहवालात टीका केली आहे. पण मी क्लिनचीट दिलेली नाही. साक्षी पुरावा आला नाही. अहवालात पुरावा नाही असं म्हटलं आहे. परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी त्यांच्याकडे पुरावे असूनही दिले नाही. पुरावे दिले असते तर नक्कीच काही घडलं असतं, असा गौप्यस्फोट न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
गृहमंत्री असताना मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माझ्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केल्यानंतर या प्रकारणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला. या संपूर्ण चौकशीनंतर आयोगाने दिलेल्या अहवालात मला क्लीन चिट देण्यात आली. मात्र राज्य सरकारने हा अहवाल मला क्लीनचिट मिळाल्यामुळे जाणीवपूर्वक दडवून ठेवला असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी वारंवार केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर चांदिवाल यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीनचीट दिलेली नाही. योग्य पुरावे आयोगासमोर समोर येऊ दिले नाहीत, असे न्या. चांदीवाल यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे चांदीवाल आयोगाने आपल्याला क्लीनचीट दिल्यामुळेच अहवाल सार्वजनिक होऊ दिला जात नाही, असा आरोप अनिल देशमुख वारंवार करतात. मात्र अनिल देशमुखांचा क्लीनचीटचा दावा न्या. चांदिवाल यांनी फेटाळला आहे.
मुलाखतीत न्या. चांदिवाल यांनी म्हटले आहे की, सचिन वाझेने दोन राजकीय व्यक्तिमत्वांची नावं घेतली होती. अजित पवार आणि शरद पवार यांची नावं वाझेंनी घेतली. मात्र ती नावे मी रेकॉर्डवर घेणार नाही, असे वाझेंना सांगितले. फडणवीसांना गुंतवण्याचाही प्रयत्न वाझे आणि देशमुखांनी केला. मात्र ते रेकॉर्डवर घेतले नाही. त्यातून प्रसिद्धी मिळते. मात्र ते मला होऊ द्यायचे नव्हते. राजकीय व्यक्तींना गुंतवून स्वतःच्या प्रसिद्धीचा मिळवायचा प्रयत्न दिसत होता, मात्र मी ते होऊ दिले नाही. सचिन वाझेने शपथपत्रात अजित पवार, शरद पवारांचे नाव घेतले. वाझे आणि अनिल देशमुखांनी फडणवीसांचे नावही गुंतवण्याचा प्रयत्न झाला. मात्र हे प्रसिद्धीसाठी सुरू असल्याचं लक्षात येताच आम्ही हे रेकॉर्डवर घेतले नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.