Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीच्या पोलिस अधीक्षक कार्यालयाचे पार्किंग बनले चार्जिंग स्टेशन वारंवार होणाऱ्या प्रकाराकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

सांगलीच्या पोलिस अधीक्षक कार्यालयाचे पार्किंग बनले चार्जिंग स्टेशन
वारंवार होणाऱ्या प्रकाराकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष



सांगली : खरा पंचनामा


शहरात पोलिस अधीक्षक कार्यालयाची देखणी इमारत उभारण्यात आली आहे. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अभ्यागतांसाठी इमारतीखाली पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या पार्किंगमध्ये चक्क इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग केली जात आहेत. याच जुलैमध्ये याबाबत 'खरा पंचनामा'ने फोटोसह बातमी दिली होती. त्यावेळी संबंधितांवर कारवाईही करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा अधीक्षक कार्यालयाच्या पार्किंगमध्ये वाहने चार्जिंग केली जात असल्याचे दिसून येत आहे.  

प्रदुषण मुक्तीसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरण्याबाबत शासनाकडून प्रसार, प्रचार केला जात आहे. नागरिकांना अशी वाहने घेण्यासाठी प्रवृत्तही केले जात आहे. पारंपरिक इंधनावरील वाहनांपासून होणारे प्रदुषण रोखण्यासह मर्यादित इंधन साठ्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. नागरिकांनीही आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली आहेत. 

शनिवारी सायंकाळी सांगलीतील शासकीय कार्यालयात एक अजबच प्रकार उघडकीस आला. येथील पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पार्किंगमध्ये चक्क दोन दुचाकी चार्जिंगला लावल्याचे दिसून आले. दुचाकी चालकांनी कार्यालयीन प्रमुखांची याबाबत परवानगी घेतली होती की नाही हे समजू शकले नाही. शासकीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये वाहनांचे चार्जिंग करणाऱ्या संबंधितांवर वरीष्ठ अधिकारी कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकाराची दखल घेऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.