Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राजकीय घराणेशाहीतही भाजपच अव्वल, काँग्रेस-राष्ट्रवादीला टाकले मागे राजकीय वारसा असलेले ८१ आमदार

राजकीय घराणेशाहीतही भाजपच अव्वल, काँग्रेस-राष्ट्रवादीला टाकले मागे
राजकीय वारसा असलेले ८१ आमदार



मुंबई : खरा पंचनामा

विधानसभा निवडणुकीत यावेळीही सर्वपक्षीय घराणेशाही अत्यंत प्रबळ असल्याचे दिसून आले आहे. विधानसभेच्या २८८ मतदारसंघांत तब्बल २३७ उमेदवार हे घराणेशाहीशी संबंधित होते. यातील ८१ उमेदवारांना विधानसभेत प्रवेश मिळाला आहे तर १५१ उमेदवारांना मतदारांनी 'घरचा रस्ता' दाखवला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केलेल्या अभ्यासातून पुढे आले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे एकेकाळी घराणेशाहीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजप घराणेशाहीत आता 'अव्वल' ठरत असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र विधानसभेची यावेळची निवडणूक अनेक अंगांनी अभूतपूर्व ठरली. राजकारणाचे, लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवत ही निवडणूक लढवली गेली. वडील विरुद्ध मुलगा, पती विरुद्ध पत्नी, काका विरुद्ध पुतण्या, भाऊ विरुद्ध भाऊ अशा लढती तर झाल्याच. मात्र वडील एका पक्षात भाऊ दुसऱ्या पक्षात, बहीण एका पक्षात भाऊ दुसऱ्या पक्षात, मुलगी एका पक्षात वडील दुसऱ्या पक्षात अशाही विचित्र लढती पाहायला मिळाल्या. एकाच वेळी एकाच कुटुंबातून दोन, दोन सदस्यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत तर घराणेशाहीने विक्रमच केला आहे.

राज्यातील ५० मतदारसंघांत दोन घराणेशाहीतील उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले तर एका मतदारसंघात चार घराण्यांतील उमेदवारांनी एकमेकाविरोधात दंड थोपटले. त्यामुळेच घराणेशाहीतीलच उमेदवार निवडून देण्याशिवाय मतदारांना पर्याय राहिला नसल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.