अल्पसंख्यांक समाजाने आपल्या हक्काबरोबरच कर्तव्येही जाणणे आवश्यक : रावसाहेब पाटील
दक्षिण भारत जैन सभेत अल्पसंख्याक हक्क दिन साजरा
सांगली : खरा पंचनामा
अल्पसंख्यांक समाजाला सुरक्षितता लाभावी. ज्या ज्या देशात जो जो समाज अल्पसंख्यांक आहे, त्यांच रक्षण व्हावं, त्यांना योग्य ती वागणूक मिळावी, संविधानाने हा हक्क दिला असला तरी अल्पसंख्याक समाजाने कर्तव्याचेही भान ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन व महाराष्ट्र जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील यांनी केले.
दक्षिण भारत जैन सभेच्या मध्यवर्ती कार्यालयात जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला. सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील व चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते भ. महावीरांच्या प्रतिमेसमोर दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना रावसाहेब पाटील म्हणाले, आपल्या देशात जैन, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन, पारसी हे अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात. अल्पसंख्यांकामध्येसुद्धा धार्मिक आणि भाषिक दोन्ही प्रकारचे अल्पसंख्याक समाज असतो. देशपातळीवर बघितले तर जसे हिंदू समाज काश्मिरमध्ये अल्पसंख्याक आहे जैन समाज तर संपूर्ण देशात अल्पसंख्याक आहे. चीनमध्ये बौध्दधर्म अल्पसंख्याक असला तसेच इराण-इराक या देशात मुस्लिम समाज बहुसंख्य असला तर इतर समाज तरी बाकीचा समाज अल्पसंख्याक असतो. सर्वच अल्पसंख्याक समाज गुण्यागोविंदाने रहावा यासाठीच हा दिन आजच्या दिवशी साजरा केला जातो. अल्पसंख्याक म्हणून ज्या लाभाच्या योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी एक्झि. ट्रस्टी राजेंद्र झेले, विभागीय ट्रस्टी अनिल बागणे व शांतिनाथ नंदगावे, महामंत्री प्रा. एन. डी. बिरनाळे, महिला महामंत्री सौ. कमल मिणचे व सौ. विजयाताई पाटील, भाऊसाहेब पाटील, सौ.विमलपाटील, संदीप राजोबा व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.