Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

केंद्राशी समन्वय अधिक सोपा होण्यासाठी गृह खातं भाजपकडे : फडणवीस

केंद्राशी समन्वय अधिक सोपा होण्यासाठी गृह खातं भाजपकडे : फडणवीस



मुंबई : खरा पंचनामा

गृह विभाग आमच्याकडे असावा, असं आमचं मत आहे. मागील काही वर्षांत हे खातं आमच्याकडे राहिलेलं आहे आणि गृह विभागाला केंद्रीय गृह मंत्रालयाशीही सतत समन्वय साधावा लागत असतो.

कारण राज्यात नक्षलवादाची समस्या आहे, मुंबईसारखी आर्थिक राजधानी आहे. तसं एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेदेखील केंद्राशी समन्वय साधू शकतात, कारण ते आमचे मित्रपक्षच आहेत. मात्र मी भाजपचा असल्यामुळे केंद्राशी समन्वय साधणं अधिक सोपं जातं. त्यामुळे हे खातं भाजपकडे राहावं, असा आमचा प्रयत्न असतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना गृह विभागाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर भाष्य करताना ते बोलत होते.

विधानसभा निवडणूक निकालात भाजपला विक्रमी १३२ जागांवर विजय झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्याचं मुख्यमंत्रिपद भाजपच्या वाट्याला गेले. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात आम्हाला गृह आणि महसूलसारखी महत्त्वाची खाती मिळावीत, यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत. त्यावरून आठवडाभर नाराजी नाट्य देखील रंगले. मात्र उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला नेमकी कोणकोणती खाती येणार, याबाबत चर्चा रंगत असतानाच फडणवीस यांनी गृहखात्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.