Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापुरातील चार पोलिस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली वरिष्ठ निरीक्षक संतोष डोके यांच्याकडे शाहपुरीचा पदभार

कोल्हापुरातील चार पोलिस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली
वरिष्ठ निरीक्षक संतोष डोके यांच्याकडे शाहपुरीचा पदभार



कोल्हापुर : खरा पंचनामा 

शहरातील तीन पोलिस निरीक्षकांसह चौघांची तडकाफडकी पोलिस मुख्यालयाकडे बदली करण्यात आली. शहरातील शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पवार, गडहिंग्लजचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर आणि गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक जाधव यांची नियंत्रण कक्षाकडे बदली करण्यात आली.

या पोलिस ठाण्याचा पदभार तात्पुरत्या स्वरूपात नव्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधातील कारवाईत कुचराई दिसून येत होती. याची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलिस अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर तातडीने जिल्ह्यात मटका अड्ड्यांवर कारवायाही झाल्या.

शाहूपुरी पोलिस ठाण्याचा तात्पुरता पदभार पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्याकडे, लक्ष्मीपुरीचा तात्पुरता पदभार निरीक्षक श्रीराम कणेरकर यांच्याकडे तर गांधीनगरचा पदभार सहायक निरीक्षक सागर वाघ यांच्याकडे देण्यात आला. दरम्यान, तडकाफडकी बदल्यांमागील नेमके कारण गुलदस्त्यात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.