Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

५२० पोलीस अधिकारी, १५ उपायुक्त... शपथविधी सोहळ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त !

५२० पोलीस अधिकारी, १५ उपायुक्त... शपथविधी सोहळ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त !



मुंबई : खरा पंचनामा

भाजपाच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर आज ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनणार असून मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी पार पडणार आहे.

या सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच इतरही काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्यासाठी किमान पाच अतिरिक्त पोलीस आयुक्त, १५ पोलीस उपायुक्त आणि २९ सहायक पोलीस आयुक्त तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय ५२० पोलीस अधिकारी आणि साडेतीन हजार कॉन्स्टेबलसुद्धा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.

शपथविधी सोहळ्यादरम्यान वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी एक अतिरिक्त पोलीस आयुक्त, तीन पोलीस उपायुक्त, ३० पोलीस अधिकारी आणि २५० इतर कर्मचारी यांचा समावेश असलेले पथक नियुक्त करण्यात आले आहे.

दरम्यान, आज केवळ तिघांचाच शपथविधी होणार असून मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील अशी माहिती आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील की त्यांच्याजागी दुसरा कुणी नेता शपथ घेईल, हे अद्याप अस्पष्ट आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.