गहाळ झालेले ४.१० लाखांचे मोबाईल नागरिकांना परत
इस्लामपूर पोलिसांची कामगिरी
सांगली : खरा पंचनामा
इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणांहून गहाळ झालेले विविध कंपन्यांचे ४.१० लाखांचे ४१ मोबाईल नागरिकांना परत देण्यात आल्याची माहिती इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.
नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोधून त्यांना ते परत देण्याच्या सूचना वरीष्ठ अधिकाऱ्यांनी इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांना दिल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक हारूगडे यांनी गहाळ मोबाईल शोधण्यासाठी एक विशेष पथक तयार केले होते. पथकाने गहाळ झालेल्या मोबाईलची तांत्रिक माहिती काढून त्यांचा शोध घेतला. पथकाला ४१ मोबाईल शोधण्यात यश आले.
पथकाने ४.१० लाख रूपये किमतीचे मोबाईल शोधून ते पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांच्याहस्ते संबंधित नागरिकांना परत केले. पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाने अमोल सावंत, शशिकांत शिंदे, विशाल पांगे, दीपक घस्ते, सतीश खोत, सायबरकडील विवेक साळुंखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.