Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सासऱ्यांच्या सल्ल्यानेच नार्वेकरांना अध्यक्ष केलंय!

सासऱ्यांच्या सल्ल्यानेच नार्वेकरांना अध्यक्ष केलंय!



मुंबई : खरा पंचनामा

अॅड. राहुल नार्वेकरांना मी नेहमी सल्ला द्यायचो की, तुम्ही मंत्री झालेले जास्त चांगलं होईल. पण, तो भाजपचा निर्णय आहे, मला त्या खोलात जायचं नाही. (तेवढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'सासरे (रामराजे नाईक निंबाळकर) म्हणतात की त्यांनाच अध्यक्ष करा,' अशी टिपण्णी केली) त्याला जयंतरावांनी हजरजबाबीने 'सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता, हे मला अलीकडच्या काळात चांगलं कळायला लागलंय,' असे उत्तर दिले.

सासऱ्यांच्या आग्रहानुसार अध्यक्ष केले, असे मी म्हणणे म्हणजे नार्वेकरांच्या कर्तबगारीवर अन्याय करणारे आहे. त्यांनी हे पद स्वतःच्या कर्तबगारीवर मिळविले आहे, अशा खास शैलीत जयंतरावांनी विधानसभेत चिमटे काढले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या अभिनंदन ठरावाच्या भाषणांमध्ये जयंत पाटील यांचे भाषण खुमासदार, खुसखुशीत आणि चिमटे काढणारे ठरले. ते म्हणाले, मागील अडीच वर्षांत आपण दोन्ही बाजूला न्याय देण्याचे काम केले आहे. संख्याबळावर तुम्ही फारसं बोट ठेवलं नाही. तोच स्वभाव तुमचा याहीवेळी कायम राहील, अशी अपेक्षा करतो.

मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांची भाषणं झाली. पण, पहिल्या भाषणपेक्षा (फडणवीस) दुसरं भाषणच (शिंदे) मुख्यमंत्र्यांचं आहे की काय असं वाटायचं आमच्यावर पाळी आली. त्यामुळे सभागृहाला प्रदीर्घ मार्गदर्शन झाले. (शिंदेंच्या लांबलेल्या भाषणावर जयंत पाटलांची कोटी)

दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर तुम्ही पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष झालात. पण, मी तुम्हाला खासगीत नेहमी सांगायचो की, परत संधी मिळाली तर आपण मंत्री व्हा. मी त्यांना नेहमी सल्ला द्यायचो की तुम्ही मंत्री झाले तर जास्त चांगलं होईल. पण आपल्या पक्षाचा तो निर्णय मला त्याच्या खोलात जायचं नाही. (तेवढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी 'सासरे (रामराजे नाईक निंबाळकर) म्हणतात की त्यांना अध्यक्षच करा,' अशी टिपण्णी केली) त्याला जयंतरावांनी हजरजबाबीने 'सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता, हे मला अलीकडच्या काळात चांगला कळायला लागलं आहे,' असे उत्तर दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.