एक्सप्रेस वेवर चाकूच्या धाकाने लूटमार करणाऱ्यास अटक
39 हजारचा मुद्देमाल जप्त, महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस वेवर अर्जुनवाड फाट्यावर चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. यातील दोन संशयित पसार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. चोरट्याकडून 39 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
सुमित शत्रुघ्न काळे (वय १९ वर्षे, रा. माजिसैनिक वसाहत पारधी वस्ती, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जितु चव्हाण (सध्या रा. पारधी वस्ती, मिरज), चव्हाण याचा मित्र (नाव, पत्ता नाही) अशी पसार झालेल्यांची नावे आहेत. दि. 22 डिसेंबर रोजी पहाटे कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस वेवर अर्जुनवाड फाट्याजवळ उभ्या असलेल्या एका कारमधील व्यक्तीला तिघांनी चाकूचा धाक दाखवून दागिने लुटले होते. त्यातील संशयिताना पकडण्याच्या सूचना गांधी चौक पोलिसांना दिल्या होत्या. सहायक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरट्याना पकडण्याचे आदेश दिले होते.
पथक चोरट्याचा शोध घेत असताना एकजण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी नशेमन हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. काळे तेथे आल्यानंतर त्याला पथकाने ताब्यात घेतले. त्याची तपासणी केल्यावर त्याच्याजवळ दागिने, घड्याळ सापडले. त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने अर्जुनवाड फाटा येथे अन्य दोन साथीदारांच्या मदतीने लुटल्याची कबुली दिली. 39 हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक करण्यात आली.
मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिलडा, महात्मा गांधी चौकचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक संदीप गुरव, श्रेणी उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, सुरज पाटील, अभिजीत धनगर, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, विनोद चव्हाण, बसवराज कुंदगोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.