राज्यातील 5 आयएएस अधिकाऱ्यांच्य बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात पुन्हा एकदा 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदल्यांचे आदेश जारी केले. या आदेशानुसार, विविध विभाग आणि महामंडळांमधील महत्त्वाच्या पदांवर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी आयएएस अधिकारी मनीषा आव्हाळे यांची आता उल्हासनगर महापालिकेत महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच, नुकतेच याआधीचे प्रकल्प संचालक डॉ. निपुण विनायक यांची बदली सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर आता या पदावर राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आयएएस पंकज कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी हे आदेश जारी केला आहेत. याआधी मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांची पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या जागी आयएएस किशोर तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आधी महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत होते. तसेच, आयएएस नंदकुमार बेडसे यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आयएएस अनिता मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, नवीन सरकार आल्यानंतर सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.