Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही : संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट

कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही  : संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट



कोल्हापूर : खरा पंचनामा 

कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. पुढील आठवड्यात व्यापक बैठक घेऊन डिजिटल मीडिया पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
         
ज्येष्ठ संपादक, राजकीय विश्लेषक आणि माध्यमतज्ञ  राजा माने यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आणि राज्यभरात बारा हजारांहून अधिक सभासद संख्या असणाऱ्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा व शहर कार्यकारिणीच्या निवडी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत झाल्या. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी आज (शुक्रवारी) कोल्हापूर येथे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी प्रदेश सचिव तेजस राऊत व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांच्या हस्ते मंत्री पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नूतन पदाधिकाऱ्यांच्या भावी वाटचालीस मंत्री पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
          
यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य रितेश पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले, जिल्हा सचिव संजय सुतार, जिल्हा सहसचिव इंद्रनील मराठे, कोल्हापूर शहराध्यक्ष अझरुद्दीन मुल्ला, माजी शहराध्यक्ष प्रशांत चुयेकर, शहर उपाध्यक्ष विजय यशपुत्त, महिला आघाडी  जिल्हाध्यक्षा सायली मराठे, जिल्हा कार्याध्यक्षा सौ. प्रीती कलढोणे, इचलकरंजी शहराध्यक्ष सॅम संजापुरे, शहर सचिव अक्षय पोवार, शिरोळ तालुकाध्यक्ष इकबाल इनामदार, महेश पाटील, संभाजी चौगुले, बिभीषण भातलवंडे, शिवकुमार संसुद्धी आदी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.