Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्क्रीन गार्डच्या 50 रुपयांसाठी मोबाईल दुकानातील कामगाराचा निर्घृण खून, एकजण जखमी सांगली बस स्थानकजवळील घटना, चार अल्पवयीन ताब्यात

स्क्रीन गार्डच्या 50 रुपयांसाठी मोबाईल दुकानातील कामगाराचा निर्घृण खून, एकजण जखमी 
सांगली बस स्थानकजवळील घटना, चार अल्पवयीन ताब्यात 



सांगली : खरा पंचनामा 

शहरातील बस स्थानकजवळ असलेल्या एका मोबाईल दुकानात स्क्रीन गार्ड घेण्यासाठी गेलेल्या चार युवकांनी 50 रुपये कमी न केल्याने कामगाराचा कोयता, गुप्तीने सपासप वार करत निर्घृणपणे खून केला. यावेळी दुकानातील आणखी एक कामगार जखमी झाला आहे. रविवारी सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

विपुल पुरी गोस्वामी (रा. सांगली, मूळ रा. राजस्थान) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर स्वरूप पुरी गोस्वामी जखमी झाला आहे. बस स्थानकजवळ भैरवनाथ मोबाईल्स नावाचे दुकान आहे. सकाळी 11 च्या सुमारास चार अल्पवयीन युवक या दुकानात स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी गेले होते. मृत विपुलने गार्डची किंमत शंभर रुपये सांगितली तर संशयित ते गार्ड 50 रुपयांना मागत होते. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यानंतर संशयितानी कोयता आणि गुप्तीने त्याच्यावर सपासप वार केले. त्यावेळी दुकानातील अन्य कामगारांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. 

मात्र संशयित ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी आणखी वार केले. विपुल रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर ते तिथून निघून गेले. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या विपुलला उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात जाईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, शहरचे निरीक्षक संजय मोरे यांनी पाहणी केली. 

घटनेनंतर एलसीबी आणि शहर पोलीस संशयितांचा शोध घेत होते. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीवरून चार अल्पवयीन युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु असल्याचे शहरचे निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.