Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बीड पोलीस खात्यात वाल्मिक कराडच्या मर्जीतले अधिकारी; तृप्ती देसाईंनी थेट नावे जाहीर केली

बीड पोलीस खात्यात वाल्मिक कराडच्या मर्जीतले अधिकारी; तृप्ती देसाईंनी थेट नावे जाहीर केली



बीड : खरा पंचनामा 

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि इतर आरोपी अटकेत असून सीआयडी आणि बीड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याशिवाय वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कालच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही गौप्यस्फोट केले. अंजली दमानिया यांच्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीदेखील या प्रकरणात उडी घेतली आहे. तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडचे बीड पोलीस दलातील कनेक्शन उघडकीस आणले आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात तृप्ती देसाईंनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. वाल्मिक कराडवर खंडणी रॅकेट आणि त्याच्या राजकीय वरदहस्त बाबत चर्चा सुरू आहे. वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो. विरोधकांकडूनही त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. असे असतानाच आता भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे.

वाल्मिक कराडचे जाळे बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. तसेच, त्याचे निकटवर्तीय आणि मर्जीतील पोलिस अधिकारी मोठ्या प्रमाणावर असल्याचा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्याचबरोबर देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पारदर्शीपणे करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर तृप्ती देसाई यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाची यादी जाहीर केली असून, या पोलिसांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी देखील केली आहे.

तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलिसांची यादी सोशल मीडियावर शेअर केली आहे, ज्यात कॉन्स्टेबलपासून ते अधिकारी पर्यंतच्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी, गृहमंत्रालयाने या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

देसाई यांनी जाहीर केलेली नावे : बाळराजे दराडे, बीड ग्रामीण API, रंगनाथ जगताप, अंबाजोगाई ग्रामीण API, भागवत शेलार, केज बीट - LCB, संजय राठोड, अंबाजोगाई - Additional Police, त्रिंबक चोपने, केज - Police, बन्सोड, केज API, कागने सतिश, अंबाजोगाई - Police, दहिफळे, शिरसाळा - API, सचिन सानप, परळी बिट - LCB, राजाभाऊ ओताडे, बीड - LCB, बांगर बाबासाहेब, केज Police, विष्णु फड, परळी शहर - Police, प्रविण बांगर, गेवराई PI, अमोल गायकवाड, युसुफ वडगाव - Driver Police, राजकुमार मुंडे, अंबाजोगाई DYSP ऑफिस - Police, शेख जमिर, धारूर Police, चोवले, बर्दापुर - Police, रवि केंद्रे, अंबाजोगाई - Police बापु राऊत, अंबाजोगाई - Police, केंद्रे भास्कर, परळी - Police, दिलीप गित्ते, केज DYSP ऑफिस Police, डापकर, DYSP ऑफिस केज - Police, भताने गोविंद, परळी Police, विलास खरात, वडवणी - Police, बाला डाकने, नेकनुर - Police, घुगे, पिंपळनेर - API

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.