Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता हाक आडनावाने नाही, तर नावानेच! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा पुढाकार

आता हाक आडनावाने नाही, तर नावानेच!
बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा पुढाकार



बीड : खरा पंचनामा 

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये सामाजिक परिस्थिती मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यात दोन घटकांतील तणावही समोर येत आहेत. सामाजिक घटकांबरोबरच पोलिस दलातील सलोखा कायम ठेवण्यासाठी आणि मतभेद व मनभेद टाळण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी पुढाकार घेतला आहे.

पोलिस दलात यापुढे एकमेकांना हाक देताना आडनाव नाही तर नावाने हाक दिली जाईल. तसेच, कर्तव्यावर असताना रील्स काढण्यावरही पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी निर्बंध घातले.

अनेकदा आडनावाच्या उच्चारावरून जातीचा संबोध होतो. ते टाळण्यासाठी नावानेच हाक देण्याच्या सूचना कॉवत यांनी केल्या. नावाने हाक दिल्याने आपुलकी व जवळीक वाटते, असेही त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी यापुढे सगळ्या प्रकारची जबाबदारी ठाणेदारांचीच असेल. ठाण्यातील कोणावरही लाचलुचपतची कारवाई झाली, तर त्यालाही ठाणेप्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल.

रील्सचे फॅडही सर्वत्र वाढले आहे. पोलिस खात्यातसुद्धा कर्मचाऱ्यांपासून अधिकारीही रील्स काढण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशांनाही नवनीत कॉवत यांनी तंबी दिली आहे. कर्मचाऱ्यांनी ऑन ड्युटी रील्स काढली तर त्याच्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.