राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा विमा कंपनीला दणका!
कुंडलच्या शेतकऱ्याच्या दहा वर्षांच्या लढ्याला यश
सांगली : खरा पंचनामा
कुंडल येथील शेतकरी कै. नामदेव लाड यांचा ट्रॅक्टर चोरीला गेला होता. त्या ट्रॅक्टरचा पूर्ण रकमेचा विमा एच डी एफ सी अर्गो या विमा कंपनीकडे उतरविला होता. तो ट्रॅक्टर दि. 13 जून 2013 रोजी शेतातील शेड फोडून चोरीला गेला. तेव्हा ट्रॅक्टर शेतात असलेल्या शेड मधे उभा होता. सदर ट्रॅक्टर चोरीला गेल्याची माहिती ग्राहकाने लागलीच पोलीस स्टेशमध्ये जावून कळवली. पोलिसांनी कच्ची नोंद केली व पंधरा दिवसांनी येणेस सांगितले, तसेच चोरी झालेल्या दिवशी शनिवार असल्यामुळे विमा कंपनीकडे सदर घटनेची नोंद देता आली नाही. सोमवारी सदर चोरीची नोंद घेण्यात आली.
विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला असता विलंबाने घटना पोलीस स्टेशनला व विमा कंपनीकडे नोंदवली या कारणास्तव तसेच ग्राहकाचा निष्काळजीपणा या दोन कारणास्तव विमा दावा नामंजूर करण्यात आला.
ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण आयोग कोल्हापूर येथे डी. एम. धावते यांचेमार्फत ग्राहक तक्रार दाखल केली. त्याचा निकाल ग्राहकाच्यावतीने लागला. तेव्हा त्या आदेशावर विमा कंपनीने पहिले अपील राज्य ग्राहक आयोगा खंडपीठ परिक्रमा कोल्हापूर येथे दाखल केले. तेव्हा ग्राहकाच्या वतीने वकील वैभव मुकुंद केळकर व डी. एम. धावते यांनी काम पाहिले. सदर विमा कंपनीचे अपील ना. राज्य ग्राहक आयोगाने फेटाळून लावले व खालच्या आयोगाचा निकाल कायम केला व अर्जदार ग्राहकास ट्रॅक्टर ची संपूर्ण रक्कम व्याजासहित देणे चा आदेश देण्यात आला.
त्यानंतर सदर आदेशावर विमा कंपनीने दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक आयोगात पुन्हा दाद मागितली तेव्हा ग्राहकाच्या वतीने वकील केळकर व धावते यांनी काम पाहिले. राष्ट्रीय ग्राहक आयोग यांनी देखील विमा कंपनीने केलेले अपील फेटाळून लावले व जिल्हा व राज्य आयोगचा निकाल कायम केला व विमा कंपनीस 2 लाख 57 हजार 370 रुपये हे सन दोन हजार चौदा पासून 9 तक्के व्याजाने देणेचा आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग नवी दिल्ली यांनी कायम केला. तब्बल दहा वर्षे शेतकऱ्यांने दिलेल्या कायदेशीर लढ्याला यश आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.