राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'EWS' प्रवेशित प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशास मान्यता
मुंबई : खरा पंचनामा
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिकवर्ष २०२४-२५ करिता राबविण्यात आलेल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) संवर्गातून प्रवेशित झालेल्या परंतु, विहित नमुन्यामध्ये EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांबाबत संदर्भाधिन पत्रान्वये शासनास प्रस्ताव प्राप्त झाला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात आलेल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) संवर्गातून प्रवेशित झालेल्या काही विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील EWS प्रमाणपत्राऐवजी केंद्र सरकारच्या नमुन्यातील EWS प्रमाणपत्र सादर केले आहे.
सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन, केवळ या शैक्षणिक वर्षाकरिता एकवेळची विशेष बाब म्हणून, सदरहू विद्यार्थ्यांनी सादर केलेले केंद्र सरकारच्या नमुन्यातील EWS प्रमाणपत्र प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तरी, त्या अनुषंगाने पुढील आवश्यक कार्यवाही आपल्या स्तरावरुन तात्काळ करावी असे आदेश आज राज्य शासनाने काढले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.