Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक दीपक सुपे यांचा मिरजेत सत्कार महात्मा गांधी चौक मंडळाने प्रजासत्ताकदिनी केला सन्मान, प्रशासनाची मात्र उदासीनता

राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक दीपक सुपे यांचा मिरजेत सत्कार 
महात्मा गांधी चौक मंडळाने प्रजासत्ताकदिनी केला सन्मान, प्रशासनाची मात्र उदासीनता 



सांगली : खरा पंचनामा 

मिरज शहरात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा बनावटीची दारू पकडून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्य उत्पादन शुल्कचे मिरजचे निरीक्षक दीपक सुपे यांचा डॉ. नथनियल ससे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे प्रमुख उपस्थित होते. मिरजेतील महात्मा गांधी चौक मंडळाचे अध्यक्ष प्रभात हेटकाळे यांनी संयोजन केले होते.

मिरजेतील महात्मा गांधी चौक मंडळातर्फे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. काही दिवसापूर्वी मिरजेत एक्सप्रेस वेवर मध्यप्रदेश, गोवा, महाराष्ट्रातील दारूची बेकायदा दारू वाहतूक करताना दोघांना अटक करण्यात आली. यावेळी 68 लाखांचा माल जप्त करण्यात आला. या कामगिरीबद्दल राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक दीपक सुपे यांच्यासह त्यांच्या टीमचा सत्कार करण्यात आला. 

दरम्यान प्रजासत्ताकदिनी सांगलीतील मुख्य शासकीय कार्यक्रमात पोलीस, महसूल तसेच अन्य विभागातील उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. मात्र त्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. शिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. राज्य पातळीवरही या कामगिरीची दखल ण घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल कसे वाढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.