वेटरवर रिव्हॉल्व्हर रोखणारा पोलिस निलंबित; पोलिस अधीक्षकांचा दणका
नाशिक : खरा पंचनामा
नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथील एका हॉटेलमध्ये जेवण करीत असताना नाशिक ग्रामीणच्या पोलिस अंमलदाराने शासकीय रिव्हॉल्व्हर हॉटेलच्या वेटर रोखल्याचा प्रकार नुकताच घडला असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाची गंभीर दखल नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी घेतली असून संशयित पोलिस अंमलदारास निलंबित करण्यात आले आहे. तसेच विभागीय चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांकडून संशयित पोलिस अंमलदारास अटक केली जाण्याची शक्यता आहे. विशाल झगडे (रा. नाशिक) असे वेटरवर रिव्हॉल्व्हर रोखणार्या पोलिस अंमलदाराचे नाव असून, त्यास निलंबित करण्यात आले आहे. विशाल हा नाशिक ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असून जिल्ह्यातील शिंदे गटाच्या एका आमदाराचा तो अंगरक्षक असल्याचे समजते. यापूर्वीही त्याने अनेकांना धमकावल्याचेही प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी घेतली. त्यानुसार त्यास विशाल झगडे याच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
तसेच, विभागीय चौकशीचे आदेश दिले असून कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. दरम्यान, नाशिकरोड पोलिसांकडून दाखल गुन्ह्यात विशाल यास अटक केली जाण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.