Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सख्खे बहिण-भाऊ ठरले ‘निष्णात’! दिल्लीत झाल्या स्पर्धा; पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मुलांचे यश

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सख्खे बहिण-भाऊ ठरले ‘निष्णात’!
दिल्लीत झाल्या स्पर्धा; पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मुलांचे यश



सांगली : खरा पंचनामा 


दिल्ली येथे आयोजन करण्यात आलेल्या ६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सख्या मोरे बहिण-भावाने १२ बोअर शॉटगन- ट्रॅप या प्रकारात निष्णात नेमबाज (रिनाउंड शूटर) होण्याचा बहुमान मिळवला. शरयू आणि आदित्य मोरे अशी त्या दोघा नेमबाजांची नावे  आहेत. त्यांचे वडिल, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोरे यांनी ही माहिती दिली. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


आदित्य मोरे हा अभियंता असून तो सध्या पुण्यातील डी. वाय. पाटील इन्स्टिट्युटमधे येथे मास्टर ऑफ टेक्नोलॉजीचे शिक्षण घेतो आहे. तर शरयू मोरे ही बारामती येथे एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकते. दोघेही उच्चशिक्षण घेत असताना क्रीडा प्रकारताही विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. सातारा जिल्ह्यातील सासुर्वे हे त्यांचे मुळ गाव असून सध्या दोघेही कोल्हापूर येथे वास्तव्यास असून तेथील जे. बी. कुसाळे शुटींग फौउंडेशनचे सदस्य आहेत. वडिल संजय मोरे हे पोलिस दलात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनाही महाविद्यालयीन वयापासून नेमबाजी स्पर्धेत रस होता. त्यांनीही अनेक स्पर्धेत यश मिळवले आहे. त्यांचाच आदर्श घेवून दोघांनी या क्रीडा प्रकाराची निवड केली.

दिल्ली येथील स्पर्धेत देशभरातून हजारवर खेळाडू पात्र ठरले होते. अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या १२ बोअर शॉटगन- ट्रॅप या क्रीडा प्रकारात दोघांनी यश मिळवले. दोघांनाही विजेतेपद मिळवून निष्णात नेमबाज म्हणून होणाचा बहुमान मिळवला. शरयू हिने राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत यापुर्वी पाच सुवर्ण, एक रौप्य, तर दोन कास्य पदकांची कमाई केली आहे. बालेवाडी (पुणे) येथील निष्णात शुटींग प्रशिक्षक सिद्धार्थ पवार यांचे मार्गदर्शन दोघांना लाभले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.