Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सैफवर हल्ला करणारा बांग्लादेशी? घरात कसा घुसला? कुणी मदत केली? डीसीपी दीक्षित गेडाम यांनी सगळचं सांगितलं..

सैफवर हल्ला करणारा बांग्लादेशी? घरात कसा घुसला? कुणी मदत केली?
डीसीपी दीक्षित गेडाम यांनी सगळचं सांगितलं..



मुंबई : खरा पंचनामा 

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या हल्लेखोराचं थेट बांग्लादेश कनेक्शन समोर येत आहे.

बदलून तो येथे राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद (वय 30) असे त्याचे नाव असल्याची माहिती डिसीपी दिक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, पोलिसांना ताब्यात घेतलेला हा व्यक्ती आधी त्याची खरी ओळख सांगत नव्हता. नावेही वेगवेगळी सांगत होता. परंतु, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे तो भारतीय असल्याचा पुरावा सापडला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानवर हल्ला करणारी बांग्लादेशी आहे. त्याच्याकडे भारतीय असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. यावरून तो मूळचा बांग्लादेशी नागरिक असल्याचं सिद्ध होत आहे. बेकायदेशीरपणे त्याने भारतात प्रवेश केला होता. भारतात आल्यानंतर त्याने नावात बदल केला असण्याची शक्यता आहे. कारण बांग्लादेशातून येणारे घुसखोर गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात. त्यांच्याकडून नावे बदलून भारतात वास्तव्य करण्याची पद्धत आहे हे याआधीही अनेकदा दिसून आलं आहे.

आरोपी मूळचा बांग्लादेशी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. भारतात बेकायदेशीरपणे आल्यानंतर येथे त्याने त्याचं नाव बदललं असावं. कारण सुरूवातीला त्याने त्याचं नाव विजय दास असं सांगितलं होतं. पाच महिन्यांपूर्वीच तो भारतात आला होता. सुरुवातीला तो मुंबईत राहायचा. हा आरोपी येथील हाऊस किपिंगच्या एजन्सीत काम करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार आरोपी हा सातत्याने कपडे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. पोलीसही त्याचे लोकेशन ट्रेस करत होते. ठाण्यातील लेबर कॅम्प भागात त्याचे लोकेशन मिळाले. नंतर लागलीच पोलिसांनी या भागात कोंबिंग ऑपेरशन सुरू केलं. पोलिसांना आपला सुगावा लागू नये यासाठी आरोपीने अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरलं होतं. तरी देखील पोलिसांच्या नजरेतून तो सुटला नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.