लग्नात भेटल्याने पक्ष जवळ येतात किंवा युती होते इतका भाबडा विचार...
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील राजकारणात गेल्या काही वर्षांत धक्कादायक गोष्टी घडत आहेत. राज्यातील सर्वच राजकीय समीकरणे बदललेली आहेत. २५ वर्ष एकत्र असलेले उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात आहे.
शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु असते. आता चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची एका लग्नसमारंभात भेट झाली. त्या भेटीनंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यावर भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी मार्मिक उत्तर दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, लग्नात भेटणे हे स्वाभाविक आहे. मी तिथे असतो तर माझीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाली असती. त्यात फार काही विशेष नाही. पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्याने पक्ष जवळ येतात किंवा युती होते इतका भाबडा विचार हा किमान तुमच्या सारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात येऊ नये, ही आमची अपेक्षा आहे, असा जोरदार टोला फडणवीस यांनी माध्यमांमधील राजकीय तत्ज्ञांना लगावला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.